सचिन पाटील (सोनू ) निर्घृण खून प्रकरणातील दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात


उत्राण प्रतिनिधी शेख जैनुल

एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारात सचिन उर्फ सोनू देविदास पाटील( राहणार अंतुर्ली  खुर्द ,प्र 3 ता, पाचोरा) या तरुणाच्या पीर बाबा जवळ निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली जुन्या पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे संपूर्ण परिसरात चर्चिले जात आहे सकाळी सात वाजता सचिन पाटील यांचा धारदार शास्त्राने त्यांच्या डोक्यात व मानेजवळ वार करून खून झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे कासोदा पोलीस ठाण्यात किरण सुभाष पाटील (राहणार अंतुर्ली खुर्द प्र 3 ता, पाचोरा) यांच्या फिर्यादीवरून निलेश ज्ञानेश्वर देसले (राहणार गिरड तालुका भडगाव) यांच्या विरुद्ध गुरंन 22/2023 भारतीय दंड विधान कलम 302, 120, व 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे

दोन जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे सकाळी झालेल्या या घटनेनंतर परिसरात या विषयाची एकच चर्चा होती उत्राण गिरणा परिसरात अनेक दिवसापासून वाळूची वाहतूक होत आहे याच वाळूच्या वादातून हा खून झाल्याचे सर्वत्र चर्चिले जात आहे किरण पाटील यांनी दिलेल्या  फिर्यादीत उसनवारीच्या पैशातून निलेश ज्ञानेश्वर देसले राहणार गिरड याने कारस्थान रचून सचिनच्या खून केल्याचे म्हटले आहे सचिन हा सकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या घरीच होता सहानंतर तो घरातून बुलेटवर निघाला त्यानंतर या बुलेटला मागून कुठल्यातरी चार चाकी गाडीने धडक दिली व धारदार शास्त्राने वार करून त्याच्या खून करण्यात आला खबर मिळताच कागदा पोलीस स्टेशनच्या ए पी आय नीता कायटे या सहकार्यासोबत घटनास्थळी दाखल झाल्या घटना व तिचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे डी वाय एस पी अभयसिंग देशमुख यांनी ताचडीने घटनास्थळी पाहणी करत तपासाची चक्रे गतिमान केली व संशयावरून शुभम ज्ञानेश्वर पाटील (राहणार गिरड तालुका भडगाव) व समाधान सुधाकर पाटील राहणार वेरूळी तालुका पाचोरा यांना ताब्यात घेतले आहे

Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या