प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
ग्रेट पे वाढविण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारलेल्या नायब तहसीलदारांच्या मागणीवर बुधवारी कोणताही तोडगा निघाला नाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मंत्रालयात नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली. नायब तहसीलदारांची मागणी रास्त असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले त्याचवेळी त्यांना त्यांनी हा संप मागे घेऊन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा असे आव्हान केले संघटनेने मागणी मान्य झाली नसल्याचे आपले आंदोलन सुरू राहणार असल्याचे जाहीर केले
महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे महसूल विभागात नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे मात्र नायब तहसीलदार पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 चे नसल्याने संघटनेने तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता संघटनेने ग्रेट पे 4800 करण्यासाठी सरकारला याआधी बेमुदत संपाची नोटीस ही दिली होती या नोटीशीची दखल न घेतल्याने नायब तहसीलदारांनी काम आंदोलन पुकारले आहे
या संदर्भात संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश बगळे यांनी सांगितले की महसूल खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी बी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात सरकारच्या स्तरावर दिरंगाई सुरू आहे आज महसूल मंत्री सोबत झालेल्या चर्चेत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे
.jpeg)
0 टिप्पण्या