प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
राज्य सरकारने वेतनश्रेणीची मागणी मान्य केल्याने गुरुवारी नायब तहसीलदारांनी आपला संप मागे घेतला राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता नायब तहसीलदारांना 4 हजार 800 अशी वेतनश्रेणी मिळणार आहे
महसूल विभागात नायब तहसीलदार राजपत्रित अधिकारी वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे मात्र नायब तहसीलदार पदाचे वेतन राज पत्रित वर्ग 2 चे नसल्याने संघटनेने नायब तहसीलदार यांचे ग्रेड पे वाढविण्यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता संघटनेने ग्रेट पे 4800 करण्यासाठी सरकारला याआधी बेमुद्त संपाची नोटीस ही दिली होती या नोटीसाची दखल न घेतल्याने नायब तहसीलदारांनी 3 एप्रिल पासून काम बंद आंदोलन पुकारले होते या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल बुधवारी नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली होती संघटना आपल्या मागणीवर ठाम असल्याने काल संपावर कोणताही तोडगा निघाला नव्हता त्यामुळे विखे पाटील यांनी आज पुन्हा पदाधिकाऱ्यांची चर्चा केली

0 टिप्पण्या