-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जवखेडे सिम येथे वीर भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

जवखेडे सिम येथे वीर भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी

एरंडोल, दि. २६ फेब्रुवारी: जवखेडे सिम, ता. एरंडोल येथे आज वीर भगवान एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात एकलव्य भगवान यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमात, जवखेडे सिमचे सुपुत्र आणि BSF जवान अजय संजय मोरे यांनी एकलव्य भगवान यांची आरती केली. या कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रतिक जाधव, माजी सरपंच जवखेडे सिम सरूबाई सुकदेव मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य रतन सोनावणे, संजय मोरे, नामदेव मोरे, आण्णा मोरे, समाधान ठाकरे, चंदू मोरे, आबा सोनवणे, राहुल सोनवणे, अनिनाश मोरे, समाधान मोरे, विजय मोरे, भूषण चौधरी, विशाल मोरे, वासुदेव मोरे, गणेश ठाकरे, राजू मोरे, भास्कर मोरे, सोनु नाईक, छोटू नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात एकलव्य भगवान यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.






advertising articles 2

-->