उमरे येथे लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण व जंतनिर्मूलन शिबिर संपन्न
मार्च ०९, २०२६
एरंडोल (प्रतिनिधी) : आज दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२, आडगाव, ता. एरंडोल अंतर्गत उमरे येथे जनावरांमध्ये होणाऱ्या लाळखुरकत (FMD) रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात केंद्र शासनाच्या लाळखुरकत रोग प्रतिबंधक मोहिमेच्या ८ व्या फेरीअंतर्गत जनावरांना लसीकरण करण्यात आले तसेच जंत निर्मूलनाचीही मोहीम राबविण्यात आली.
सदर शिबिराचे आयोजन डॉ. प्रदीप झोड (उपयुक्त पशुसंवर्धन विभाग, जळगाव) आणि डॉ. योगेश महाले (सहाय्यक आयुक्त, एरंडोल) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी उमरे ग्रुप ग्रामपंचायत मालखेडा चे सरपंच श्री. सचिन विठ्ठल पाटील, पशुधन पर्यवेक्षक श्री. अविनाश थोरात (पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२, आडगाव), परिचर श्री. शामलाल सोनार, फिरते पशुवैद्यकीय पथकाचे डॉ. यशवंत धवसे (पशुधन विकास अधिकारी), श्री. सुदर्शन पाटील (पशुधन पर्यवेक्षक), श्री. भूषण कोळी (चालक) तसेच लसीकरण मदतनीस आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून जनावरांना लसीकरण करून लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे नियमित लसीकरण करून पशुधनाचे संरक्षण करावे, असे आवाहनही करण्यात आले.