-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

उत्राण (ता. एरंडोल) शाळेचा तिहेरी यशाचा मान – शिक्षकांचा सत्कार

उत्राण (ता. एरंडोल) शाळेचा तिहेरी यशाचा मान – शिक्षकांचा सत्कार
उत्राण (गु.ह.), ता. एरंडोल येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी यश संपादन केले आहे. शाळेच्या विविध शैक्षणिक व उपक्रमशील कार्याची दखल घेत जिल्हास्तरावर या शाळेची “उपक्रमशील शाळा” म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचबरोबर शाळेतील शिक्षक श्री. मनोहर माळे यांची जिल्हास्तरावर “उपक्रमशील शिक्षक” म्हणून निवड झाली असून त्यांच्या नावावर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची जिल्हास्तरावर दखल घेण्यात आली.

तसेच शाळेचे उपशिक्षक श्री. राजेशकुमार सोनवणे यांनी केंद्रप्रमुख परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचा आणि गावाचा गौरव वाढवला आहे.
या तिहेरी यशानिमित्त शाळेतील शिक्षक वृंदाच्या वतीने सर्व यशस्वी शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शिक्षकांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उत्राण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या या यशामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.

advertising articles 2

-->