-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

ग्राहक सशक्तीकरणाचा संदेश देत एरंडोलात जागतिक ग्राहक दिन साजरा

ग्राहक सशक्तीकरणाचा संदेश देत एरंडोलात जागतिक ग्राहक दिन साजरा

एरंडोल : “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासू ग्राहक” या संकल्पनेवर आधारित जागतिक ग्राहक दिन एरंडोल येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात दि. १५ मार्च २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शिवाजीराव अहिरराव होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे जिल्हा संघटक कैलास महाजन, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, तालुकाध्यक्षा आरती ठाकूर तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे, बाजारपेठेत सुरक्षित व दर्जेदार वस्तूंची निवड करणे आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण करणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कैलास महाजन, रविंद्र पाटील, शिवाली देशमुख, नुरुद्दीन मुल्ला व आरती ठाकूर यांनी ग्राहक सशक्तीकरण आणि जबाबदार बाजारपेठ यावर समोयोचित भाषणे केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक वैराळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अमोल महाजन यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रसाद दंडवते, डॉ. राखी काबरा, वंदना कुलकर्णी, पत्रकार प्रवीण महाजन, पत्रकार प्रतिक जाधव, संजय पाटील, कमर अली सय्यद, सचिन महाजन, कुंदन ठाकूर, शिवाली देशमुख, वैशाली पाचपोर (पुरवठा निरीक्षक, एरंडोल), ऋषीप्रसाद पोळ व निरज सुरळकर (पुरवठा लिपिक) आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advertising articles 2

-->