-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना : यूडीआयडी नोंदणी अनिवार्य, अन्यथा १ एप्रिल२०२६ पासून अनुदान स्थगित

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना : यूडीआयडी नोंदणी अनिवार्य, अन्यथा १ एप्रिल२०२६ पासून अनुदान स्थगित
प्रतिनिधी : नुरुद्दीन मुल्लाजी
एरंडोल शहर व तालुक्यातील संजय गांधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह एरंडोल येथील संजय गांधी कार्यालयात हजर राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांनी आधार कार्ड, यूडीआयडी (Unique Disability ID) कार्ड, बँक पासबुक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन संजय गांधी शाखेत भेट देणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप यूडीआयडी कार्ड काढलेले नाही, त्यांनी त्वरित जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अर्ज करून हे कार्ड प्राप्त करून घ्यावे.
तहसीलदार श्री. गोपाळ पाटील यांनी स्पष्ट केले की, ज्या लाभार्थ्यांची यूडीआयडी नोंदणी पूर्ण झालेली नसेल, त्यांचे अनुदान दिनांक १ एप्रिल २०२६ पासून स्थगित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक तोटा टाळण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे..

advertising articles 2

-->