-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चेतरजी वसावा यांची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करून तातडीने जामीन मंजूर करावा; भिल समाज विकास मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चेतरजी वसावा यांची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करून तातडीने जामीन मंजूर करावा; भिल समाज विकास मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
एरंडोल | प्रतिनिधी
गुजरात राज्यातील डेडियापाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतरजी वसावा यांना राजकीय षड्यंत्रातून खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच त्यांना तातडीने जामीन मंजूर करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भिल समाज विकास मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, एरंडोल यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, जळगाव यांना सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २५ जून २०२६ रोजी सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या विविध व्हिडिओ आणि माहितीनुसार आमदार चेतरजी वसावा यांच्यावरील कारवाईबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. संबंधित प्रकरणामध्ये सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यासोबतच चेतरजी वसावा यांना न्यायालयीन प्रक्रियेत तातडीने जामीन मिळावा व त्यांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या न्याय, अधिकार व संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी शासनाने निष्पक्ष भूमिका घेत योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा भिल समाज विकास मंचाने व्यक्त केली आहे.

हे निवेदन महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक बुधा अहिरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.

यावेळी सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ, एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे, युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे, लक्ष्मण जावळे, पंढरीनाथ मोरे, सखाराम मोरे, वासुदेव गायकवाड, राजधर सोनवणे, करण सोनवणे, मोतीराम जावळे, हिरालाल सोनवणे, बादल ठाकरे, करण बेलदार, आकाश ठाकरे, अजय बेलदार, कुणाल अहिरे, दीपक सूर्यवंशी यांच्यासह भिल समाज विकास मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(टीप : वरील वृत्त हे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनावर आधारित असून, त्यामधील आरोप व दावे हे निवेदनकर्त्यांचे आहेत. त्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.)

advertising articles 2

-->