वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सचित्र 'बाल मित्र' पुस्तकांचे वाटप; सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
जून २९, २०२६
उत्राण | तालुका एरंडोल
समाजहिताची जाणीव ठेवत विलास महाजन आणि अमोल महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना सचित्र 'बाल मित्र' पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, ज्ञानवृद्धी व्हावी आणि संस्कारक्षम साहित्य त्यांच्या हातात पोहोचावे, या उद्देशाने सचित्र बाल मित्र पुस्तके भेट देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा संदेश दिला.
यावेळी मा. सभापती अनिल महाजन, मा. सरपंच विनोद महाजन, ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुरुदास चौधरी, पोलीस पाटील राहुल महाजन, हिरालाल पाटील, पत्रकार प्रकाश कुवर, प्रफुल्ल तिवारी, राजू कोळी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विलास महाजन व अमोल महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे यश ठरला.