-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस व जागतिक हँडबॉल दिनानिमित्त जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न

चाळीसगाव येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस व जागतिक हँडबॉल दिनानिमित्त जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
चाळीसगाव, (किशोर जाधव) : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स, के.के.सी. कॉमर्स व के.आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस तसेच जागतिक हँडबॉल दिन निमित्त आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.

स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त क्रीडा शिक्षक व माजी मुख्याध्यापक श्री. बाबा सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. खुशाल देशमुख तसेच क्रीडा शिक्षक श्री. ब्रह्मा साळुंखे उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये मॅनेजिंग बोर्ड चेअरमन मा. नारायणभाऊ अग्रवाल, व्हाइस चेअरमन व आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चेअरमन मा. योगेशभाऊ अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष मा. आर. सी. आबा पाटील, उपाध्यक्ष मा. मिलिंददादा देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल चेअरमन नानासो प्रदीप अहिरराव, सीनियर कॉलेज कमिटी चेअरमन मा. सुरेशभाऊ स्वार, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन मा. नानाभाऊ कुमावत, क्रीडा समिती अध्यक्ष श्री. योगेशभाऊ करनकाळ, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजय काटे, डॉ. पूनम निकम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जगदीश चौधरी, तालुका क्रीडा समन्वयक श्री. अजय देशमुख, कार्यालयीन अधीक्षक श्री. हिम्मत अंदोरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देत स्पर्धेच्या आयोजनास सहकार्य केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परेश पवार, कल्पेश चौधरी, निखिल आगोणे, शुभम बच्छे, स्वप्निल गवळी आणि तेजस राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली.

जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली असून, क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

advertising articles 2

-->