बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेजला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दुहेरी क्रीडा सन्मान
जुलै २२, २०२६
चाळीसगाव | प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट क्रीडा कामगिरीबद्दल बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स व के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव यांना "मैदानी खेळ २०२५-२६ विजेता (पुरुष)" तसेच "ओव्हर ऑल सांघिक खेळ तृतीय विजेता" हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यंदा धनदाई महाविद्यालय, अंमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमधील महाविद्यालयांच्या एकूण कामगिरीचे गुणांकन करून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. मैदानी खेळांमध्ये सर्वाधिक पदके मिळविल्याबद्दल महाविद्यालयाला "मैदानी खेळ २०२५-२६ विजेता (पुरुष)" हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच विविध खेळ प्रकारांमध्ये सर्वाधिक विजेते, उपविजेते, तृतीय क्रमांक तसेच उल्लेखनीय सहभागाची नोंद केल्याबद्दल "ओव्हर ऑल सांघिक खेळ तृतीय विजेता" हा बहुमान महाविद्यालयाला मिळाला.
हा पुरस्कार मा. प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील (अध्यक्ष), उपप्राचार्य डॉ. जयवंराव पाटील व विभाग सचिव डॉ. शैलेश पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांच्या वतीने क्रीडा संचालक प्रा. खुशाल देशमुख यांनी स्वीकारला.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक, प्राध्यापक आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल, व्हाइस चेअरमन योगेशभाऊ अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष आर. सी. आबा पाटील, उपाध्यक्ष मिलिंददादा देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, आनंदीबाई बंकट मुलींचे हायस्कूल चेअरमन प्रदीप (नानासो) अहिरराव, सीनियर कॉलेज कमिटी चेअरमन सुरेशभाऊ स्वार, ज्युनिअर कॉलेज कमिटी चेअरमन नानाभाऊ कुमावत, क्रीडा समिती अध्यक्ष योगेशभाऊ करनकाळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, डॉ. पूनम निकम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिल मगर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख, कार्यालयीन अधीक्षक हिम्मत अंदोरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.