-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोद्यात कब्रस्तान व शादी हॉल उभारणार; आमदार अमोलदादा पाटील यांची ग्वाही

कासोद्यात कब्रस्तान व शादी हॉल उभारणार; आमदार अमोलदादा पाटील यांची ग्वाही
कासोदा | प्रतिनिधी : आरिफ पेंटर
कासोदा येथील मुस्लिम समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. हजरत नामदार शाह बाबा दर्ग्याजवळ आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार अमोलदादा पाटील यांनी मुस्लिम समाजाच्या विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करत कब्रस्तान व शादी हॉलसाठी आपल्या निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमोलदादा पाटील म्हणाले की, "कासोदा येथील मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान व शादी हॉल उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. अनेक वर्षे काँग्रेस पक्षाने मुस्लिम समाजाला भीती दाखवून केवळ राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. आता तुम्ही माझ्याशी जोडले आहात, त्यामुळे तुमच्या समाजाची सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासोदाचे सरपंच पुरुषोत्तम उर्फ (बंटी) भास्कर चौधरी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुश्ताक सर यांनी तर प्रस्ताविक मुख्तार सर यांनी केले.

यावेळी जावेद कादर मुजावर, ॲड. अहमद जे. सय्यद तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव सुभाष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी जुल्फीकार अली तवक्कल, अजमल पठाण, शरीफ पठाण, बिलाल काजी, इश्ताक अली यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनोजभाऊ पाटील, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद जळगाव ज्ञानेश्वर (धोंडू) आमले, शिवसेना तालुकाप्रमुख रविंद्रभाऊ जाधव, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदामतात्या राक्षे, माजी युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, शिवसेना शहरप्रमुख तथा माजी सरपंच महेशबापू पांडे, शहर संघटक संदीप मराठे, युवासेना शहरप्रमुख सोनूभाऊ शेलार पैलवान, शिवसेना उपशहर प्रमुख अमोलभाऊ पवार पैलवान, कासोदा आठगाव गटप्रमुख भूषणभाऊ शेलार पैलवान, अल्पसंख्याक आघाडी तालुकाप्रमुख ॲड. अहमद जे. सय्यद तसेच अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जावेद कादर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती.

advertising articles 2

-->