-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अनिताताई शिंदे यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी दर्शन; परिसरात भक्तिमय वातावरण

अनिताताई शिंदे यांच्या निवासस्थानी श्री महालक्ष्मी दर्शन; परिसरात भक्तिमय वातावरण
चाळीसगाव (योगेश मोरे ): अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा महिला संघटक तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या जिल्हा संघटक अनिताताई शिंदे यांच्या चाळीसगाव येथील बसंती ऑइल मिल परिसरातील निवासस्थानी श्री महालक्ष्मी दर्शनाचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात आज शुक्रवारी पार पडला.

श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिक, महिला तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. यावेळी धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.

अनिताताई शिंदे या सामाजिक व संघटनात्मक कार्यात सक्रिय असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा महिला संघटक म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक म्हणूनही त्या संघटनात्मक जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या निवासस्थानी आयोजित श्री महालक्ष्मी दर्शन सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी उपस्थित भाविकांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेत सुख-समृद्धी आणि सर्वांच्या मंगलमय भविष्यासाठी प्रार्थना केली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या दर्शन सोहळ्यामुळे परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

advertising articles 2

-->