कासोद्यात ‘सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ ’चा निकाल जाहीर मोठ्या गटात निलेश पाटील तर लोकेश शिरसाठ लहान गटात प्रथम
सप्टेंबर १८, २०२६
कासोदा, ता. एरंडोल : कासोदा गावाची ओळख ‘अधिकाऱ्यांचे गाव’ अशी व्हावी, या उद्देशाने ओमसाईराम शासकीय कर्मचारी गृप, कासोदा यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत प. पू. सद्गुरू गोविंद महाराज सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना मिळावी तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी त्यांची तयारी व्हावी, या उद्देशाने घेण्यात आलेल्या या परीक्षेत मोठा गट, लहान गट आणि उत्तेजनार्थ गुणवंत विद्यार्थी अशा विविध गटांत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
मोठा गट गुणवंत विद्यार्थी
मोठ्या गटात प्रथम पारितोषिक निलेश मनोहर पाटील, डी. डी. एस. पी. कॉलेज, एरंडोल, इयत्ता १२ वी; द्वितीय पारितोषिक चेतन रविंद्र देवकर, एस. आय. जे. टी. सी. धरनगाव, इयत्ता १२ वी; तर तृतीय पारितोषिक अक्षता सुरेश सोनार, उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव, इयत्ता १२ वी हिने मिळविले.
लहान गट गुणवंत विद्यार्थी
लहान गटात प्रथम पारितोषिक लोकेश नरहरी शिरसाठ, भारती विद्या मंदिर, कासोदा, इयत्ता ८ वी; द्वितीय पारितोषिक यश जितेंद्र पाटील, साधना माध्यमिक विद्यालय, कासोदा, इयत्ता ८ वी; तर तृतीय पारितोषिक ईशांत किशोर चौधरी, Progressive English Medium School, इयत्ता ८ वी याने मिळविले.
उत्तेजनार्थ गुणवंत विद्यार्थी
उत्तेजनार्थ गटात यश युवराज ठाकूर, देवेंद्र किशोर चौधरी, आकाश गोपेश पाटील, स्वाती किशोर चौधरी आणि अपूर्वा घनश्याम एरे या विद्यार्थ्यांची गुणवंत म्हणून निवड करण्यात आली आहे.
ओमसाईराम शासकीय कर्मचारी गृपच्या वतीने दरवर्षी स्वखर्चातून हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांच्या यशाचा गौरव करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे आणि कासोदा गावातून भविष्यात अधिकाधिक अधिकारी घडावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ओमसाईराम शासकीय कर्मचारी गृपच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.