-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जळगाव | अजितदादांच्या पुतळा अनावरणासाठी आमदार अमोल पाटील, संजय पवारांची शरद पवारांशी भेट

जळगाव | अजितदादांच्या पुतळा अनावरणासाठी आमदार अमोल पाटील, संजय पवारांची शरद पवारांशी भेट
जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार व आमदार अमोल पाटील यांची भेट; कार्यक्रमाची तारीख व वेळ निश्चित करण्याबाबत सकारात्मक चर्चा

प्रतिनिधी नुरूद्दीन मुल्लाजी
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उपस्थित राहावे, यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजयजी पवार आणि एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या भेटीत पुतळा अनावरण सोहळ्याच्या आयोजनासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शरदचंद्र पवार यांच्या सोयीने कार्यक्रमाची तारीख व वेळ निश्चित करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करणाऱ्या या सोहळ्यास पवार साहेबांची उपस्थिती लाभावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

भेटीदरम्यान शरदचंद्र पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाची तसेच बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. सहकार क्षेत्रातील बँकेची भूमिका, शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी असलेले नाते आणि बँकेच्या आगामी वाटचालीबाबतही त्यांनी चर्चा केली.

यावेळी आमदार अमोल पाटील यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. मतदारसंघातील विविध विकासविषयक बाबींवरही यावेळी सविस्तर चर्चा झाली.

दरम्यान, माजी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रकृतीची शरदचंद्र पवार यांनी आस्थेने विचारपूस केली. जुन्या परिचयाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आबासाहेबांच्या तब्येतीची माहिती घेतली.

दीर्घ सार्वजनिक जीवनातील अनुभवाच्या आधारे पवार साहेबांनी विविध विषयांवर संवाद साधला. बँकिंग, सहकार, शेतकरी आणि मतदारसंघातील विकासकामांबाबत झालेल्या चर्चेमुळे ही भेट विशेष महत्त्वपूर्ण ठरली.

स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरदचंद्र पवार यांची उपस्थिती निश्चित करण्याच्या दृष्टीने झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या सोयीप्रमाणे कार्यक्रमाची तारीख व वेळ लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

advertising articles 2

-->