-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

जवखेडेसीमच्या सुपुत्राची मंत्रालयात मोठी जबाबदारी; सुनील पाटील- सूर्यवंशी यांची सहआयुक्तपदी पदोन्नती

जवखेडेसीमच्या सुपुत्राची मंत्रालयात मोठी जबाबदारी; सुनील पाटील- सूर्यवंशी यांची सहआयुक्तपदी पदोन्नती
जवखेडे सीम ता.एरंडोल : चे भूमिपुत्र तथा आदर्श शिक्षक नानासाहेब तुकाराम गुरुजी यांचे सुपुत्र सुनील तुकाराम पाटील सूर्यवंशी यांची उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सहआयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे जवखेडेसीमसह परिसरातील नागरिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुनील तुकाराम पाटील सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, प्रशासकीय कार्यक्षमता आणि शिक्षण क्षेत्राप्रती असलेली बांधिलकी यामुळे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील महत्त्वाच्या सहआयुक्तपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मंत्रालयातील महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारणे ही निश्चितच जवखेडेसीम गावासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशामागे वडील नानासाहेब तुकाराम गुरुजी यांचे संस्कार, शिक्षणाची प्रेरणा आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.

या पदोन्नतीमुळे त्यांच्या कार्याची नवी जबाबदारी आणि व्याप्ती वाढली असून, उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जवखेडेसीम ग्रामस्थ, मित्रपरिवार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

advertising articles 2

-->