पारोळा | आमदार दहीहंडी’ Reels Competition चा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
सप्टेंबर २०, २०२६
पारोळा : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार दहीहंडी’ Reels Competition चा बक्षीस वितरण समारंभ लोकप्रिय आमदार मा. ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या रील्स स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक अक्षय पायघन, द्वितीय क्रमांक हर्ष राजपूत तर तृतीय क्रमांक शिव सोनार यांनी पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जि.प. मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मा. जि.प. सदस्य भुराआप्पा पाटील, नगांव मा. सरपंच नाना पाटील यांच्यासह मान्यवर, स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमामुळे तरुणांना आपली कलात्मकता व सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले. बक्षीस वितरण सोहळ्यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले