-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चाळीसगाव | दहीहंडी महोत्सवातील रील स्पर्धेच्या विजेत्यांचा उत्साहात गौरव

चाळीसगाव | दहीहंडी महोत्सवातील रील स्पर्धेच्या विजेत्यांचा उत्साहात गौरव
हर्षल पाटील प्रथम, विवेक बोरसे द्वितीय तर यधनेश राठोड तृतीय क्रमांकाचे मानकरी

चाळीसगाव : शिवसेना–युवासेना व मा. खासदार उन्मेश दादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी महोत्सव–२०२६ निमित्त घेण्यात आलेल्या REEL स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मा. खासदार उन्मेश दादा पाटील जनसंपर्क कार्यालय, चाळीसगाव येथे उत्साहात पार पडला.

दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या रील स्पर्धेला युवक-युवतींसह विविध वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षल पाटील, द्वितीय क्रमांक विवेक बोरसे, तृतीय क्रमांक यधनेश राठोड यांनी मिळविला. तर चतुर्थ क्रमांक गजानन कासार व समर्थ कासार यांनी पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उन्मेशदादा पाटील, संपदाताई पाटील, समाधान पाटील, भाऊसाहेब पाटील, रवींद्र चौधरी, दिनेश बोरसे, दिलीप पाटील, अरुण पाटील, योगेश मोरे, अनिल चव्हाण, बबडी शेख, सागर आगोणे, स्वामी पाटील, विकी देशमुख, गणेश महाजन, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत तायडे, बबन पवार, मनोज करंकाळ, दीपक खंडाळे, लक्ष्मण गवळी,हेमराज पाटील,ओम पाटील,अमित सुराणा,सागर मुलमुले,गणेश महाले,जितेंद्र पाटील,गणेश महाजन,कल्पेश मालपुरे,लक्ष्मण उन्हाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

रील स्पर्धेमुळे दहीहंडी महोत्सवाला सोशल मीडियाची आधुनिक जोड मिळाली असून, युवकांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्पर्धकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

advertising articles 2

-->