-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

::: prajanewsmaharatra.com


कोरोनाचा वाढत्या प्रभावा कारण दळणवळण बंद करणे अत्यावश्यक असे माननीय पंतप्रधान:- नरेंद मोदी  यांनी आकाशवाणी च्या वाहिनि वर हितगुंज करतांना सांगितले.!


नवी दिल्ली – देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळण बंदीचा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी दळणवळण बंदीमुळे अनेक कष्टकरी आणि कामगार यांना त्रास सहन करावा लागत असल्याविषयी देशवासियांची क्षमा मागितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली सूत्रे
१. दळणवळण बंदीमुळे अनेकांची गैरसोय होत असून हातावर पोट असलेल्या नागरिकांना अत्यंत कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.
२. कोरोनाशी लढाई करायची असेल, तर दळणवळण बंदीसारख्या कठोर निर्णयाविना पर्याय नव्हता. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची आणि त्यामुळे होत असलेल्या मृतांची संख्या वाढत असून हे चिंताजनक आहे. देशात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आम्ही दळणवळण बंदीचा निर्णय घेतला.
३. दळणवळण बंदीचे नियम पाळून तुम्ही इतरांना साहाय्य करत आहात, असे नसून तुम्ही स्वतःच स्वतःला साहाय्य करत आहात. जे दळणवळण बंदीचे नियम मोडतील, त्यांना पश्‍चाताप होईल.
४. आधुनिक वैद्य, परिचारिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांना साहाय्य करा.
५. या संकटाच्या काळात आपण गरिबांना साहाय्य केले पाहिजे. हीच आपली संस्कृती आणि संस्कार आहेत.

advertising articles 2

-->