हनुमंत खेडे सिम येथे हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात गोऱ्हा दगावला
एप्रिल १४, २०२०
हनुमंतखेडे सिम येथे हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यात गोऱ्हा दगावला
प्रतिनिधी : नूरुद्दीन मुल्लाजी
हणमंतखेडे सिम : कासोदा तालुका एरंडोल जवळ असलेले हनुमंत खेडे सिम येथे हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात गोऱ्हा दगावल्याची तक्रार स्वतः शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली हनुमंत खेडे सिम येथील किशोर राजाराम पाटील यांच्या शेतात दिनांक 13 एप्रिल रात्री तीन वाजेच्या सुमारास शेतात असलेले गिरे जाती चा गोऱ्हा वय चार ते पाच वर्ष हा हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात दगावला अशी तक्रार शेतकरी राजाराम पाटील यांनी वन विभागाला केली शेतात आजही काही गुरेढोरे शेतीकामाला असलेले शेतमजूर रहिवास करीत आहे त्यांच्यासाठी संरक्षण द्यावे व झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे