अमळनेर येथील पोलीस निरीक्षक देवदूत श्री. अंबादास मोरे यांचे डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चे मिशन देवदूत अंतर्गत आभार
अमळनेर प्रतिनिधी : सत्तार खान
पोलीस निरीक्षक देवदूत श्री. अंबादास मोरे हे दैनंदिन अहोरात्र 24 तास कार्यरत आहेत. अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत आहेत.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि तालुक्यात सातत्याने गस्त घालून बेकायदेशीर कार्य करणाऱ्या व्यक्तींवर कार्यवाही करत आहेत. शहरात शांतता आणि सुव्यवस्था आबादीत ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यदक्ष आहेत.अमळनेर येथे अस्तित्वात असलेल्या कोव्हीड केअर सेंटरला रोज सकाळ संध्याकाळ प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतात.तसेच प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांमधील पोलिस बंदोबस्त तसेच आरोग्य सेविका व आशा वर्कर यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना तात्काळ मदत व प्रतिसाद देण्याचे काम करतात तसेच शहरातील विविध संस्था यांच्या माध्यमातून पोलिसांचे आरोग्य तपासणी प्रचलित डॉक्टरांकडून करून घेतल्या तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शहरातील नामांकित डॉक्टर यांच्याकडून तपासणी करून आणि त्यांना मल्टी विटामिन गोळ्या, सी विटामिन च्या गोळ्या आणि सनी टायझर अशा विविध गोष्टीपासून त्यांना मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे.डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चे मिशन अंतर्गत देवदूत पोलीस निरीक्षक देवदूत श्री. अंबादास मोरे याना आभार पत्र पाठविले आहे. कोरोना मुक्त झाल्यावर देवदूत पोलीस निरीक्षक देवदूत श्री. अंबादास मोरे यांचा कलाम कुटुंबियांचे उपस्थित नासिक येथे सत्कार करण्यात येईल.