-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मा आ दिलीपभाऊ वाघ यांनी शेतकऱ्यांसाठी पुकारला एल्गार,मदतीसाठी करणार शासन दरबारी पाठपुरावा

मा आ दिलीपभाऊ वाघ यांनी शेतकऱ्यांसाठी पुकारला एल्गार,मदतीसाठी करणार शासन दरबारी पाठपुरावा

मा आ दिलीपभाऊ वाघ यांनी शेतकऱ्यांसाठी पुकारला एल्गार,मदतीसाठी करणार शासन दरबारी पाठपुरावा

नगरदेवळा :- प्रतिनिधी शहेबाज शेख

शेतकरी आणि त्याच्यावर आभाळभर संकट हे समीकरण काही नवीन नाही परंतु आपल्या जिद्दीने आणि मेह्नीतीने शेतकरी राजा काबाड कष्ट करून धान पिकवित असतो जेणे करून त्याचा उदरनिर्वाह झाला पाहिजे व दोन पैसे पदरी पडायला हवे ,असे दिवास्वप्नच म्हणावे लागेल कारण प्रत्यक्षात मात्र जेव्हा तो शेतीमाल काढावयाची वेळ येते तेव्हा एकतर आस्मानी संकटे वा रोगराई पसरून पिकांचे नुकसान झालेले दिसते त्यामुळे त्याला हवे ते उत्पन्न तर सोडा पण लागत सुद्धा हातात पडत नाही त्यात अजून पीककर्जाचा वा सावकारी कर्जाचा बोजा अल्पसा शेतमाल आलाच हातात तर भावाचे वांधे नाहीतर फसवणूक ही दृष्टचक्रे त्याच्या नशिबीच आली म्हणावे कि काय ? म हा जगाचा पोशिंदा कि फक्त राजकीय जाहीरनाम्यातील सत्तालोलुप पुढाऱ्यांचे मतांचा जोगवा मागन्यासाठीचे केंद्रबिंदुय स्थान हा चर्चेला पूर्णविराम न मिळणारा भाग

शेतकरी हितासाठी काम करण्याची ओळख असलेले माजी आ दिलीपभाऊ वाघ यांनी पुन्हा एक पाउल पुढे टाकत शेतकऱ्यांचे विविध प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवून शेतकर्यांना त्यांचे न्याय मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत नमूद केले कोरोना महामारीच्या काळात मागील दोन महिन्या पासून शेतकऱ्यानसह समाजातील सर्वच घटक बेहाल झालेले आहेत आर्थिक टंचाई भासत आहे गोर गरीब जनते पासून तर श्रीमंतापर्यंत सर्वानाच या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा फटका बसलाय सध्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असून कापूस खरेदी केंद्र कमी संख्येत असल्याने तो विकणे साठी परवड होत आहे शिवाय वशिलेबाजी मुळेही तो त्रस्त आहे यासाठी पाचोरा भडगाव तालुक्यात खरेदी केंद्राची संख्या वाढवावी तसेच मका ज्वारी,बाजरी यांची खरेदी केंद्रे त्वरित तारीख  निश्चित करून सुरु करावी तसेच त्याचे पेमेंट ही अदा करावे ,खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यानकडे बी-बियाणे व शेती साहित्य खरेदी साठी पैसा नाही जिल्हा बँकेनेही त्वरित पीककर्ज वाटप करावे बळीराजाकडे हंगामाची सुरवात करणेसही पैसा हातात नाही,अल्पभूधारक शेतकर्यांना  बी-बियाणे ,रासायनिक खते मोफत उपलब्ध व्हावी ही देखील महत्वाची बाब शासनाने दखल घ्यावी                                     सदर बाबतीतील निवेदन उपविभागीय अधीकारी श्री राजेंद्र कचरे यांना देऊन या मागण्यांन  बाबत शासनाने व प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावीत व शेतकर्यांना मदत करावी ही रास्त भावना बोलून दाखविली तसेच कोविड१९ कोरोना महामारीच्या काळातील खडान खडा माहिती प्रसार माध्यमांनी जनते पर्यंत पुरविली या बद्दल ही कौतुक केले .

advertising articles 2

-->