-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पीएच.डी'ची ऑनलाइन व्हायवा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यातले पहिलेच!

पीएच.डी'ची ऑनलाइन व्हायवा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यातले पहिलेच!

पीएच.डी'ची ऑनलाइन व्हायवा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यातले पहिलेच!


नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यात प्रथमच पीएच.डी. शिक्षणक्रमाची ऑनलाइन मौखिक परीक्षा (ऑनलाइन व्हायवा) यशस्वीरीत्या राबविली. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतून व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा झाली. ऑनलाइन पद्धतीने पीएच.डी. मौखिक परीक्षा घेणारे मुक्त विद्यापीठ हे राज्यात पहिले ठरले आहे.
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मुंबईहून सादरीकरण
राज्य शासनात सचिवपदी कार्यरत अतुल पाटणे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेत सहभाग नोंदविला. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे ऑनलाइन पीएच.डी. मौखिक परीक्षा घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनात सचिवपदी कार्यरत असलेले श्री. पाटणे यांनी "लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्त्व, महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानात संदर्भात विशेष अभ्यास' या विषयात जवळपास दोन तास पॉवर पॉइंटप्रेझेंटेशनद्वारे 125 स्लाइडच्या सहाय्याने मुंबईहून सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षकांनी व उपस्थित तज्ज्ञांनी, विद्यार्थ्यांनी प्रश्‍न विचारले. विद्यापीठाच्या कॉन्फरन्स रूममध्ये कुलगुरूंसह मानव्यविद्या शाखेचे संचालक प्रा. उमेश राजदेरकर, डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार, डॉ. नागार्जुन वाडेकर व डॉ. प्रकाश बर्वे उपस्थित होते.

advertising articles 2

-->