ब्रेकिंग न्युज धक्कादायक बातमी:-भडगांव शहरात आज अजुन ७ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले
नगरदेवळा प्रतिनिधी. सैय्यद दानिश
धक्कादायक बातमी -भडगांव शहरातील अगोदरच्या पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील दि.२० रोजी १९० संशयित रुग्णांचा स्वॅप तपासणी साठी घेण्यात आला होता त्यापैकी १२० रुग्णांचा अहवाल कालच निगेटिव्ह आला असुन त्यातले ७० रुग्णांचा अहवाल प्रलंबित होता त्यानतंर दि. २४ व २६ पर्यंत ४२ सशंयित रुग्णांचा स्वॅप तपासणीसाठी घेण्यात आला आहे.असे एकुण ११२ सशंयित रुग्णांचा अहवाल अप्राप्त असुन त्यापैकी ४१ रुग्णांचा अहवाल आला असुन त्यात भडगांव शहरातील आज अजुन ७ कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याची धक्कादायक बातमी समोर येते यात भडगांव शहरातील अगोदरच्या कोरोना पॉझीटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील शनी चौक-२ कासार गल्ली- ३ इ.२ असे एकुण ७ रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याची बातमी वैदयकिय सुत्राकडुन मिळाली आहे