-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणे शक्य नसल्याने सरपंच सदस्य यांच्यात नाराजीचे सूर

ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणे शक्य नसल्याने सरपंच सदस्य यांच्यात नाराजीचे सूर

ग्रामपंचायतींना मुदतवाढ मिळणे शक्य नसल्याने सरपंच सदस्य यांच्यात नाराजीचे सूर

 प्रतिनिधी /नूरुद्दीन मुल्लाजी

 महाराष्ट्रात काही महिन्यातच 12 हजारहुनअधिक ग्रामपंचायतीच्या मुदतीत येणाऱ्या काही महिन्यात संपणार आहे कोरोना च्या संकटामुळे राज्यात लॉक डाऊन वाढत आहे या कारणाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आले आहे ग्रामपंचायतीला मुदतवाढ देणे अशक्य असल्याने तोपर्यंत ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करून ग्रामपंचायतीच्या कारभार पाहिला जाणार आहे राज्यात जवळपास 12 हजारहून अधिक ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत मुदतवाढ मिळावी म्हणून सरपंच संघटनांनी ग्राम विकास मंत्री यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते परंतु कायद्याच्या बंधनामुळे ग्रामपंचायतीला मुदतवाढ देता येत नाही त्यामुळे 12 हजारहून अधिक ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे कोरनासंकटामुळे निवडणूक घेणे चुकीचे वाटते निवडणुका शासनाने पुढे ढकलले  आहेत तोपर्यंत ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे कायद्यात असल्याने शासन प्रशासन नियुक्त करीत आहे या निर्णयाचे सर्वांनी या निर्णयाचे सर्वांनी मदत करावी असे काही जाणकारांचे मत आहे परंतु कोरोना च्या संकटाला तोंड देत सरपंच ग्रामपंचायत सदस्य याकाळात गोरगरिबांना किराणा वाटप ,अपंगासाठी उपक्रम, बाहेरगावाहून येणाऱ्या आरोग्य तपासणी करणे ,विलगीकरण करणे असे विविध कामे उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे शासनाने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त केले तर ही लढाईमध्ये थांबेल त्याचे परिणाम काय होणार हे आज सांगता येणार नाही म्हणूनच सरपंच ग्रामपंचायत सदस्य  नाराजी व्यक्त करीत आहे

advertising articles 2

-->