-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

नगरसेविका योजना पाटील यांचा यशस्वी लढा कोरोनाशी

नगरसेविका योजना पाटील यांचा यशस्वी लढा कोरोनाशी

नगरसेविका योजना पाटील यांचा यशस्वी लढा कोरोनाशी


 भडगाव 

नगरदेवळा प्रतिनिधी
भडगांव ड्यूटी वरील कोरोना योद्धा रक्षक पोलीस स्टेशन,तहसील,नगरपरिषद,सरकारी रुग्णालय अधिकारी तथा कर्मचारी तसेच कोरोना कैंटन्टमेंट,सेंटर वरील कर्मचारी सहकारी, आरोग्य,आशा,आंगणवाड़ी स्वयंसेविका तसेच रहिवाशांना नगरसेविका योजना  पाटील यांनी अर्सेनिक् ऐल्बम 30 गोळ्या व माहिती पत्र वाटप केले. जगभरात कोरोना विषाणु संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. भडगांव  शहरात तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा  पादुर्भाव होऊ नये.आपल्या आरोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेले अर्सेनिक् ऐल्बम 30 या औषधी गोळ्या वाटप यशस्विनी सामजिक जनजागृती अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील व डी.डी.पाटील सर घरोघरी तसेच कोरोना प्रतिबंध ड्यूटीवरील सर्व कर्मचारी,पत्रकार, वृत्तपत्र वितरक यांना मास्कसह फिजिकल डिस्टेंट ठेउन मार्गदर्शक सूचना पत्रकाद्वारे करीत आहेत.यशस्वी लढा कोरोनाशी घरात रहा सुरक्षित रहा आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करा. भडगांव शहर आत्मविश्वासाने कोरोनामुक्त करुया व ग्रामीण भागाकड़ेही लक्ष्य देऊया असा संकल्प करण्याचे आवाहनही नगरसेविका योजना पाटील  करीत आहेत.

advertising articles 2

-->