-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

शेतकऱ्यांची घोर निराशा व चेष्टा करणारे शासन:- आ. गिरीष महाजन,...शेतकी संघा तर्फे मका खरेदीस सुरुवात..

शेतकऱ्यांची घोर निराशा व चेष्टा करणारे शासन:- आ. गिरीष महाजन,...शेतकी संघा तर्फे मका खरेदीस सुरुवात..

शेतकऱ्यांची घोर निराशा व चेष्टा करणारे शासन:- आ. गिरीष महाजन,...शेतकी संघा तर्फे मका खरेदीस सुरुवात..


 ता,जामनेर 
जामनेर प्रतिनिधी: - विठ्ठल चव्हाण
येथील शेतकी संघ मार्फत आज दि.३० पासून मका खरेदीस सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार महाजन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याचे , शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे म्हणणारे व शेतकरी हिताच्या निव्वळ गप्पा मारणारे शासन असून गेल्या २०,२५ वर्षात असे शासन महाराष्ट्रात आलेले नाही. बऱ्याच दिवसांपासून आम्ही शासनाकडे मका, ज्वारी, कापूस खरेदी करण्याची मागणी करीत होते.प्रत्येक वेळी शासन काही ना काही कारण पुढे करून ,जसे गोडाऊन उपलब्ध नाही, बारदन नाही, सुतळी नाही.असे एक ना अनेक कारणे पुढे करण्यात येत होते. आतापर्यंत शासनाने १०टक्के सुध्दा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केलेला नाही.आणि त्यांना आपला कापूस बाहेर व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भावाने विक्री करावा लागला.आज मका खरेदीस जरी सुरुवात करण्यात आली असली तरी तहसील दार यांनी सांगितले की २५० पोते (बारदान ) मिळाले आहे.त्यात किती शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जाईल. ह्या उदासीन धोरणामुळे बऱ्याच म्हणजे ७५ टक्के शेतकऱ्यांनी आपला मका बाहेर व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा ५० टक्के कमी भावाने विक्री केला आहे. असे एक ना अनेक प्रश्न आमदार महाजन यांनी उपस्थित केले. शेवट पर्यंत एक हजार क्विंटल मका सुध्दा हे सरकार खरेदी करु शकणार नाही. त्यामुळे हे सरकार मका खरेदी करण्याचे निव्वळ थोतांड करीत असून शेतकऱ्यांची निव्वळ चेष्टा चालविली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने मला मका खरेदी चे उद्घाटन करावे लागले.मात्र शासनाकडून चार पाच शेतकऱ्यांचा सुध्दा मका खरेदी केला जाणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, उपसभापती बाबुराव गवळी, तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर तालुका एजूकेशन सो.चे सचिव जितेंद्र पाटील,मार्केट कमेटीचे सचिव प्रसाद पाटील व  शेतकी संघाचे सदस्य उपस्थित होते.

advertising articles 2

-->