-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

चाळीसगाव भडगाव रोडवर तांदुळवाडी येथून जवळच तितुर नदीच्या काठावरील उमरखेड येथे घराचे छत कोसळून दोन बालिका जखमी तर एक चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव भडगाव रोडवर तांदुळवाडी येथून जवळच तितुर नदीच्या काठावरील उमरखेड येथे घराचे छत कोसळून दोन बालिका जखमी तर एक चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

चाळीसगाव भडगाव रोडवर तांदुळवाडी येथून जवळच तितुर नदीच्या काठावरील उमरखेड येथे घराचे छत कोसळून दोन बालिका जखमी तर एक चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू


 ता भडगाव   तांदुळवाडी 
चाळीसगाव प्रतिनिधी भोजराज आमले 
चाळीसगाव भडगाव रोडवर तांदुळवाडी येथून जवळच तितुर नदीच्या काठावरील उमरखेड येथे घराचे छत कोसळून दोन बालिका जखमी तर एक चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
उमरखेड गाव सम्पूर्ण आदिवासी समाज असून सर्व आदिवासिंचा मुळ व्यवसाय मच्छीमार करणे,उसतोडी व शेतमजुरी करून आपली उपजिविका भागविण्याचा आहे येथील रहिवासी श्री.शिवाजी गंभीर भिल्ल हे मुलगा दीपक शिवाजी भिल्ल यांच्या सोबत शेतमजुरी करण्यासाठी गेले 
शिवाजी भिल हे आपल्या लहान लहान तिघी मुली व  पत्नी कविता दीपक भिल्ल यांना घरी सोडून कामाला गेले असतांना कविता भिल्ल हिने आपले तिघी लेकींना जेवण दिले लहान मुलीला झोपळ्यात टाकले व इतर दोघ मुलींना जमिनीवर झोपवून धुणीभांडी करण्यासाठी घरबाहेर असताना मातीच्या घराचे छत  कोसळले त्यातच तिघी कन्या मातीच्या ढिगाऱ्यात दाबल्या  गेल्याने आईने मोठ्याने आरडाओरडा केला घटनास्थळी गावातील ग्रामस्थ श्री शामराव पाटील, गोकुळ पाटील तात्या भाऊ भिल्ल रघुनाथ भिल्ल व इतर ग्रामस्थांनी संपुर्ण मातीच्या छताच ढिगार कोरून तिघीना जखमी अवस्थेत बाहेर काढले  व तात्काळ ्प्राथिमिक आरोग्यकेंद्र  कजगावला दाखल केले मात्र पुढील उपचारासाठी चाळीसगाव नेत असतांना  नैना दिपक भिल्ल चा मृत्यू झाला ,शारदा दीपक भिल्ल (5वर्ष) तसेच द्वितीय शालू दीपक भिल्ल (3वर्ष) जखमीअवस्थेत उपचारासाठी पाठवण्यात आले
या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने उमरखेड गावात शोककळा पसरली आहे..
तरी या बेघर आदिवासी कुटुंबाला शासनाने त्वरित मदत दयावी अशी परिसरातून मागणी होत आहे.. 
भडगाव च्या तहसीलदार श्रीमती माधुरी आंधळे ,तलाठी रत्नदीप माने,सरपंच उमेश देशमुख, विकास चव्हाण मंडळअधिकारी बी. डी. पाटील सह ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते..

advertising articles 2

-->