नाशीकातील मार्केट लोकांनीच ओपन करून घेतल्याने यथ्येच्च आणि तुडुंब गर्दी होत आहे!
मे १४, २०२०
नाशिकातील मार्केट लोकांनीच ओपन करून घेतल्याने यथ्येच्च आणि तुडुंब गर्दी होत आहे!
नाशिक प्रतिनिधी : योगेश देवपुरकर
मेन रोड, दहीपूल, कानडे मारुती लेन, भद्रकाली, फळ बाजार, चौक मंडई, फुले मंडई, सराफ बाजार, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, निमाणी, मार्केट यार्ड, पेठ फाटा, मखमलाबाद, अशोक स्तंभ, एमजी रोड, मेहेर, सीबीएस, सारडा सर्कल, जुने नाशिक, द्वारका, सिंहस्थ नगर, उपनगर, बिटको, नासिक रोड, लॅम रोड, देवळाली, विहितगाव, मुंबई नाका, इंदिरानगर, संपूर्ण सिडको, पाथर्डी फाटा, सातपूर, अंबड इत्यादी भागांमधील गर्दी अगदी पूर्वीप्रमाणेच सुरू आहे कोणाला कशाचीही भीती वाटत नाही !
दुकानदार आणि ग्राहक तोंडाला मास्क न लावता बिनधास्त वावरत आहेत सोशल डिस्टन्सींग वगैरे अंधश्रद्धा पार पुसून टाकल्या गेल्या आहेत !
नाशिकची लोकसंख्या सुमारे वीस लाख आहे!
मालेगाव औरंगाबाद अमळनेर मुंबई पुणे यांचा स्पीड बघता नाशिक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात क्रमांक एक वर येण्याची परिपूर्ण आणि भक्कम तयारी नाशिककर करत आहेत !
आज भर दुपारी तळपत्या उन्हात दहीपुल मेन रोड आणि इतर मध्यवर्ती मार्केटमध्ये उसळलेली गर्दी बघता नाशिककरांना क्रमांक एक वर जाण्याची किती घाई झाली आहे हे दिसून येते!
संपूर्ण मध्यवर्ती मार्केटमध्ये किमान तीन लाख लोक वावरले असा प्राथमिक अंदाज आहे!
पोलीस व प्रशासन हाताश होऊन जे चालले आहे ते बघण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत कारण त्यांनाही त्यांचा जीव आणि कुटुंब आहे!