जिनिंग फॅक्टरी सुरु करा मंत्र्यांनी दिले आदेश
मे २९, २०२०
जिनिंग फॅक्टरी सुरु करा मंत्र्यांनी दिले आदेश
जि.जळगाव
प्रतिनिधी | नूरुद्दिन मुल्लाजीभडगाव व पाचोरा तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात घरातच पडून असल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी दोन जिनिंग सुरू कराव्यात अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व व उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्याकडे निवेदनाने केली आहे या मागणीची सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांना भडगाव नगरदेवळा येथे तातडीने पणन महासंघाचे ग्रेडर उपलब्ध करून देण्याचे आदेश केले
भडगाव व नगरदेवळा येथील कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती तसेच या मागणीचे निवेदन संजय वाघ, नितीन तावडे, बाजार समितीचे उपसभापती एडवोकेट विश्वासराव भोसले ,तालुकाध्यक्ष विजय पाटील ,नगरसेवक रणजीत पाटील ,संतोष जाधव, डॉक्टर अमृत पाटील शरद पाटील सतीश चौधरी ,खलील देशमुख आदींनी प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांना दिले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश देसले एडवोकेट विश्वासराव भोसले यांचे 28 रोजी दूरध्वनीवरून सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी याबाबत बोलणे झाले होते तेव्हा मंत्री श्री पाटील यांनी भडगाव येथील जय भवानी शंकर जिनिंग व नगरदेवळा येथील वैष्णवी जिनिंग येथे ग्रेडर ची नेमणूक करून तत्काळ जिनिंग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले यामुळे पाचोरा भडगाव व नगरदेवळा परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे