पारोळ्यात आज पुन्हा 13 पाँझीटिव्ह कोवीड केअर सेंटर मधुन सहा जणांना डिस्चार्ज
जून १८, २०२०
पारोळ्यात आज पुन्हा 13 पाँझीटिव्ह कोवीड केअर सेंटर मधुन सहा जणांना डिस्चार्ज
पारोळा ता
पारोळा प्रतिनिधी दिलीप सोनार
येथील खाजगी लँबच्या कोरोना बाधीतांचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यात 13 जण कोरोना बाधीत निघाल्याने तालुक्यातील कोरोना बाधीतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोना बाधीतात
एकुण 13 पाॅझीटीव्ह यात
पाठक गल्ली 6(पुरूष वय वर्ष 43,8,67.स्ञी वय वर्ष 5,62,38)
भोसले गल्ली 1 (स्ञी वय वर्ष 24)
लवन गल्ली 1 (स्ञी वय वर्ष 51)
शेवडी गल्ली 1 (स्ञी वय वर्ष 18)
जडे गल्ली 1 (पुरूष वय वर्ष 37)
मोरफळ गल्ली 3 (स्ञी वय वर्ष 57,3,26) असे आहेत.
कोवीड केअर सेंटर मधुन सहा जणांना डिस्चार्ज
आज कोवीड केअर सेंटर मधुन सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डि एच पोटोळे,तहसिलदार अनिल गवांदे,डाँ प्रांजली पाटील,डाँ योगेश साळुंखे,डाँ संगिता पाटील,विठ्ठल वारकर,शहर तलाठी निशिकांत पाटील,म्हसवे तलाठी गौरव लांजेवार यांचेसह डाँक्टर्स उपस्थित होते.
---------
डिस्चार्ज रुग्णांनी काळजी घ्यावी - डाँ डि एच पोटोळे
कोवीड केअर सेंटर मध्ये बाधीत रुग्णांची देखभाल,खानपान व स्वच्छता बाबत काळजी घेतली जाते.व दहा दिवसानंतर काहीएक लक्षणे न आढळल्याने त्यास डिस्चार्ज दिला जातो.मात्र बाधीत रुग्णांनी घरी गेल्यावर विलगीकरण करुनच रहावे,वारंवार साबणाने हात धुणे,कुटुंबात एकत्र न मिसळता दहा दिवस स्वत:ची काळजी घेत डाँक्टरांच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करित कन्टमेंटझोन मधील नागरिकांची आरोग्य तपासणी बरोबर तेथील परिसरातील वर्दळ कमी करण्याच्या बाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन करण्याचे त्यांनी सांगितले.
छाया - पारोळा - कोवीड सेंटर मधुन डिस्चार्ज प्रसंगी डाँ डि एच पोटोळे,अनिल गवांदे,डाँ योगेश साळुंखे,डाँ प्रांजली पाटील,डाँ संगिता पाटील,निशिकांत पाटील ( छायाचित्र - संजय पाटील)