तळई गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमलाई मेडिकल तर्फे होमिओपॅथी गोळ्या वाटप
जून १८, २०२०
तळई गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमलाई मेडिकल तर्फे होमिओपॅथी गोळ्या वाटप
ता.एरंडोल
तळई प्रतिनिधी ज्ञानेश्वर कंखरे
तळई गावातील माजी सभापती ओंकार धनाजी पाटील यांचा लहान मुलगा नितीन पाटील(कमलाई मेडिकल) यांनी आपल्या कै. कमलबाई ओंकार पाटील आईच्या पुण्यस्मरनार्थ गावात आपल्या हातुन कोरोनाच्या या महामारी मध्ये सेवा कार्य घडावे या अनुषंगाने गावात प्रत्येक घरापर्यंत होमिओपॅथी गोळ्या पोहचवल्या त्याने गावातील ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.व गावातील लोकांनी नितीन पाटील यांचे आभार देखील मानले व त्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद सुद्धा दिले.यावेळी गावातील प्रकाश पाटील,रतन गायकवाड, ज्ञानेश्वर कंखरे, राहुल मराठे, दिगंबर पोतदार यांनी सर्व घरापर्यंत गोळ्या पोहोचवल्या