मुस्लिम धर्मगुरू व बुजुर्ग अजमेर शरीफ ची राष्ट्रीय प्रसिद्ध दर्गाचे हजरत खाजा मोईनोद्दिन चिष्ती रहमतूल्लाह अलैह बद्दल न्यूज 18 चे अँकर अमिष देवगण यांनी अपशब्द बोलून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल कडक कार्यवाही करण्याची हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची मांगणी

सिल्लोड चे मा.तहसीलदार तथा दंडधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन सादर!

प्रतिनिधी// नूरुद्दीन मुल्लाजी
 सिल्लोड- दिनांक 15 जून 2020 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 या वृत्त वाहिनीवर अमिश देवगण नामी अँकर यांनी "आर पार' या नावाने डिबेट घेत होते व त्यांनी बोलता बोलता अजमेर दर्गा चे खाजा मोइनोद्दीन चिष्ती बद्दल अपशब्द वापरले ज्या मुळे करोडो मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे. "अकरांता चिष्ती आया,लुटेरा चिष्ती आया,ऊस के बाद धर्म बदले" हे अपशब्द करोडो हिंदू मुस्लिम बांधवांच्या आस्था आणि लाखो करोडो लोक यांचे अनुयायी आहे व जग प्रसिद्ध असलेले अजमेर  दर्गा हजरत खाजा मोइनोद्दीन चिष्ती रहमतुल्लाह यांचा बद्दल जे उदगार काढले त्याबद्दल दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शकते म्हणून न्यूज 18 चे अँकर आमिष देवगण विरुद्ध त्वरित कार्यवाही करावी व त्यांच्या विरुद्ध दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हे दाखल करावी अशी विनंती हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे सिल्लोड मा.तहसिलदारा मार्फत एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे.तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मा.जे.के कुलकर्णी साहेब यांना तर उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार मा.अनिल ए.नव्हाते साहेब तसेच पोलीस स्टेशन सिल्लोड शहर येथे पोलीस ठाणे अंमलदार यांना निवेदनाची एक एक प्रत सादर करण्यात आली आहे. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, मार्गदर्शक ऍड.शेख उस्मान खान, प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार आजम पठाण, सचिव शेख शब्बीर, तालुका अध्यक्ष शेख इलियास, अल्पसंख्यांक दलित महासभा चे प्रदेशाध्यक्ष तथा सल्लागार वाजीद असलाम आदींची स्वाक्षरी होती व उपस्थिती होती...