अमळनेर शहरातील कोविंड 32 जणांची सुटका
जून १९, २०२०
अमळनेर शहरातील कोविंड 32 जणांची सुटका
प्रतिनिधी/ सत्तार खान
अमळनेर शहरातील कोविड केअर सेंटरमधुन ३२ कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची गुरुवार दि.१८ जून २०२० रोजी सुटका करण्यात आली.कोरोनामुक्तीचे पत्र आ.अनिल पाटील व मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे हस्ते देतांना मानवास फक्त भगवंताचा जप सुरक्षित ठेवेल यासाठी कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांना सदगुरु गजानन महाराजांचा फोटोसह सॅनिटायजर बाटल्यांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी,डाॅ.सौ.विद्या गायकवाड,उपमुख्याधिकारी,श्री.संदीप गायकवाड,कोविड केअर सेंटर व रुग्णालयाचे डाॅक्टर श्री.प्रकाश ताडे,डाॅ.आरती नेरपगारे,प्रशासन अधिकारी अमळनेर नगरपरिषद,श्री.संजय चौधरी,श्री.निलेश साळुंखे यांचेसह इतर आरोग्य अधिकारी,नगरपालिका कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.