जामनेर तालुक्यातील माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यापासून जिवास धोका - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल भाऊ लोढा

जामनेर तालुक्यातील माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यापासून जिवास धोका, सरकारने आ.गिरीश महाजन यांचे खाजगी पिस्तूल जमा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल भाऊ लोढा यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदना द्वारे मागणी,

 ता जामनेर 
जामनेर प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
जामनेर चे आमदार आणि माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे वीस वर्षापासून खंदे समर्थक व आता चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल लोढा यांनी माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन यांचे पासून जीवितास धोका आहे तसेच त्यांचे कार्यकर्ते नेहमीच मला ठार मारण्याची धमकी देत असुन आ. महाजन यांचे रिव्हाॅल्वर जमा करावे अशी मागणी मुख्यमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनात द्वारे करण्यात आले आहे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात लोढा म्हणतात की मी आठ महिन्यांच्या आधी भाजपा कार्यकर्ता होतो आता भाजपा सोडले राष्ट्रवादीचे काम पाहतो आहे, मला आमदार गिरीश महाजन व त्यांचे आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांचे सर्व काळे कारनामे माहीत असल्याने या विघ्न संतोषी लोकांना कडून माझ्यावर हमला करणे, अपघात करणे, दवाखान्यात असताना बरेवाईट करणे जानलेवा हमला करून जीव घेणे अशा प्रकारे सुरू आहेत,
माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून,आ. गिरीश महाजन यांचा पिस्तूल जमा करावा, तरी शासनाने दखल घेऊन मला व माझ्या परिवाराला वाचवावे, अशी मागणी प्रफुल लोढा यांनी केली असून निवेदन पत्र निवेदन प्रति गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना पाठवल्या आहे,