समाजसेवक-अशोकभाऊ चव्हाण यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज भूषण पुरस्कार प्रदान
(दि.२०'जून-२०२० रोजी संस्थापक अध्यक्ष-पंकज नालेसाहेब यांनी घरी जाऊन पुरस्कार प्रदान केला)
जि जळगाव
प्रतिनिधी -विठ्ठल चव्हाण
बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते,पिंपळगांव कमानी,ता.जामनेर येथील रहिवासी मा.अशोकभाऊ चव्हाण यांना जळगाव येथील जनमत प्रतिष्ठान तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार दि.२०'जून रोजी अशोकभाऊ चव्हाण यांच्या राहत्या घरी पिंपळगांव कमानी,ता.जामनेर येथे जाऊन सन्मानपत्र व ट्रॉफी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष,समाजसेवक-मा.पंकज नालेसाहेब,येथील सरपंचपती तथा माजी उपसरपंच-अर्जुनभाऊ राठोड,पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,माजी ग्रामपंचायत सदस्य-योगेशभाऊ राठोड,यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.*
*अशोकभाऊ चव्हाण हे बंजारा समाजाचे युवा कार्यकर्ते असून समाजातील जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून संस्थेच्या वतीने त्यांचे जळगांव जिल्ह्यासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधे विविध प्रकारचे सामाजिक कार्य चालू आहे.याचबरोबर राष्ट्रीय बंजारा टायगर्स,अॉल इंडिया डी.एन.टी.वेल्फेअर फेडरेशन-दिल्ली,म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना,मुंबई,महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी-अधिकारी संघटना-मुंबई,बृहन्मुंबई महापालिका बंजारा कर्मचारी-अधिकारी असोशिएशन-मुंबई,संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिती-मोहने/आंबिवली(कल्याण),अशा विविध संघटनांमधे सक्रीय असून यां संघटनांमार्फत विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत आहे.*
*तसेच,कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये जळगांव शहरामधे जनमत प्रतिष्ठान मार्फत सुरु असलेल्या गरीब व गरजू लाभार्थी गरीब समाजबांधवांना विविध प्रकारची सामाजिक व आर्थिक मदत, तसेच बृहन्मुंबई महापालिकेतील तसेच राज्यातील दिव्यांग बांधव तसेच कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी विविध प्रकारचे समाजिक कार्य चालू आहे.*
*अशोकभाऊ चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्कारानिमीत्त त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगांव जिल्हा पालकमंत्री-मा.ना.गुलाबरावजी पाटील,माजी जलसंपदामंत्री तसेच जामनेर तालुक्याचे आमदार-मा.गिरीषभाऊ महाजन,खा.रक्षाताई खडसे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जि.प.सदस्य-मा.संजयदादा गरुड,माजी जि.प.कृषी सभापती-मा.प्रदिपभाऊ लोढा,माजी जि.प.सदस्य-राजधरभाऊ पांढरे,विद्यमान सदस्य-अमितभाऊ देशमुख,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-मदनभाऊ जाधव,आत्मारामभाई जाधव,राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकभाऊ पवार,सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय खजिनदार-राजेश नाईक,प्रदेश उपाध्यक्ष-शेषरावदादा आडे,प्रदेश संघटक-जगदिशभाऊ राठोड,सहसंघटक-गजाननभाऊ जाधव,प्रदेश सल्लागा-शंकरभाऊ पवार,संस्थेचे उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,सचिव-विठ्ठल चव्हाण,सहसचिव-गोकूळ राठोड,संचालक-विकास चव्हाण,अजय पवार,गणेश राठोड,तुकाराम चव्हाण,ज्योतिलाल चव्हाण,विष्णू पवार,श्रीमती.सगुणा चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,पिंपळगांव कमानी येथील माजी पोलिस पाटील-त्र्यंबक चव्हाण,माजी सरपंच-रतन चव्हाण,प्रेमराज चव्हाण,रामा चव्हाण,विद्यमान सरपंच-सौ.कविताताई राठोड,उपसरपंच-सौ.कविताताई चव्हाण,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,यांच्यासह अनेक विविध सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या