ऑनलाईन पद्धतीने जागतिक योग दिन संपन्नसर फाउंडेशनचा उपक्रम. योगामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

ऑनलाईन पद्धतीने जागतिक योग दिन संपन्नसर फाउंडेशनचा उपक्रम. योगामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

 ता एरंडोल 
प्रतिनिधी -नूरुद्दीन मुल्लाजी             
जागतिक योग दिनानिमित्त आज सर फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित राज्य स्तरीय ऑनलाईन योग शिबिर उत्साहात संपन्न झाले. आज 21 जून जागतिक योग दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात राज्य देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या सर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रस्तरीय योग शिबिराचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक सुमित शिखरे यांनी झूम मिटींग द्वारा सहभागी सर्व शिक्षकांना ऑनलाइन मार्गदर्शन करून योगाचे धडे दिले. सर फाउंडेशन फेसबुक पेजवर देखील या मार्गदर्शनाचा विनामूल्य लाभ हजारो शिक्षकांना घेता आला. युजर आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने या राज्यस्तरीय योग शिबिरासाठी देशभरातील अनेक शिक्षक सहभागी झाले असल्याचे या राज्यस्तरीय योग ऑनलाईन शिबिरात सहभागी तथा सर फाउंडेशन जळगाव जिल्ह्याचे जिल्हासमन्वयक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी सांगितले.सदर आयोजन आज  सकाळी सर्वांसाठी खुले ऑनलाईन आठ ते साडे नऊ दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
  महाराष्ट्र राज्यात सर फाउंडेशनचे सिद्धार्थ माशाळे, बाळासाहेब वाघ,हेमाताई शिंदे,अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण,मधुकर घाय दार ,शाहू भारती,अर्जुन साळवे,अरुण जाधव व राज्यातील सर फाऊंडेशनचे सर्व जिल्हा समन्वयक अशा सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पोहोचले असून आज ऑनलाईन योगाचे धडे गिरविण्यासाठीसिद्धार्थ माशाळे बाळासाहेब वाघ हेमाताई शिंदे किशोर पाटील कुंझरकर, भूपेंद्र पाटील, द्वारका पिंपळे, गौरी ढ माळे ,सचिन जाधव, सखाराम पातोडी, रेणुका  शिरेगोंड, सारिका जैन, सीमा तायडे, दीपिका जाधव क्षिरसागर, वंदना कुलकर्णी ,अश्विनी झाडे, माया पगारे, सचिन जाधव, हमीद खान पठाण, आदींनी हजारो शिक्षकांसह सहभाग घेऊन योगाचे कृतीयुक्त धडे गिरविले.
दरम्यान अभिनव पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक सुमितजी शिखरे यांनी सर्वांना सर्व योगाच्या पद्धती कृतीयुक्त पद्धतीने शिकवून सहभागी सर्वांना ऑनलाईन प्रात्यक्षिक करवून घेतले. या सर फाउंडेशन च्या अभिनव पद्धतीने जागतिक योग दिनाच्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.    
 फोटो ओळी - ऑनलाइन जागतिक योग शिबिरात सहभागी सर फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक किशोर पाटील कुंझरकर व सर्व पदाधिकारी
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या