अजमेर येथील हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल अपशब्द वापरून भारतीयांची मने दुखावली याबाबत अमिष देवगण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांनी केली
अंमळनेरप्रतिनिधी / सत्तार खान
देशातील महान व सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती ( गरिब नवाज रहे ) यांच्या विषयी हिंदी न्युज १८ इंडिया चैनलचा एंकर अमीश देवगन ने अपशब्द वापरून कोरोडो लोकांची मने दुखावल्या आहे त्याच्यावर कडक कारवाई होवावी असे निवेदन शहरातील आवास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अमळनेर यांच्या कार्यालयात साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री एकनाथ ढोबळे साहेब यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली*
*आवास फाऊंडेशनच्या तर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की देशातील राजस्थान राज्यातील अजमेर येथेहिंदू मुस्लीम व सर्व जाती धर्मियांच्या श्रद्धास्थान असलेले महान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती (गरिब नवाज रहे) यांच्या विषयी न्युज 18 इंडिया याचे एडिटर अमीश देवगन याने अपशब्द वापरून देशातील मुस्लिम बांधवांची मने दुःख वली सदरील चैनलचे परवाने रद्द करून एडिटर व सी ई ओ विरुद्ध कडक व सक्तीची कारवाई करण्यात यावी*
*जगातील सुप्रसिद्ध सर्व जाती धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या महान सुफी संत हजरत ख्वाजा मोईनोदीन चिश्ती गरिब नवाज रहे यांच्या विरुद्ध वापरलेले अपशब्द मुळे मुस्लिम बांधवांच्या भावनां दुखावल्या आहे महाशयांना कडकडीची नम्र विनंती करण्यात येथे की सदरील न्युज चॅनलवर तातडीने कारवाई करण्यात यावी के यापुढे कोणत्याही चैनल अशी हरकत करणार नाही यावेळी आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष ए बी शेख, अमजद अली शहा, सैय्यद कुदरत अली,मसुदखा पठान कुरैशी, अहेमद अली सैय्यद, फैजान इकबाल शेख, सह आदि बाधंव उपस्थित होते*

0 टिप्पण्या