मदुरा मायक्रो फायनान्स लि तर्फे प्रशासनाचा सन्मान...

मदुरा मायक्रो फायनान्स लि तर्फे प्रशासनाचा सन्मान...

 ता चाळीसगाव 
चाळीसगाव प्रतिनिधी
मदुरा मायक्रोफायनांस लि तर्फे सामाजिक बांधिलकी अंतर्गत कोरोना संकटकाळात जोखीम घेऊन लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ आणि विविध सुरक्षा वस्तूंचे(मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोवस)वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड सर,मयूर भामरे सर व अन्य सहकारी तसेच मदूरा चे शाखाधिकारी,विकास कुचेकर, अजय झ
झाल्टे,वैभव पोहनकर,,अजय जाधव इ.तसेच महिला बचतगट प्रतिनिधी म्हणून योगिता नवसारे,स्वाती कुलकर्णी हे उपस्थित होते.
RBI मान्यता प्राप्त ग्रामीण,शहरी,निमशहरी 
भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिताकायमच प्रयत्नशील राहिली आहे.तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबीर,वृक्षारोपण, आरोग्यशिबिर,पूरग्रस्त मदत असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या