मलकापूर आज शहरातील २ कोरोना पॉझिटीव्ह निघालेल्या व्यक्ती मृत
आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह ६१,५ जणांचा मृत्यू, ४५ व्यक्तींनी केली कोरोनावर मात, आज रोजी तालुक्यातील ११ व्यक्ती उपचार घेत आहेत
प्रतिनिधी विठ्ठल चव्हाणमलकापूर शहरातील २ व्यक्ती आज पॉझिटीव्ह निघाल्या. त्यापैकी मोहनपुरा भागातील ५२ वर्षीय पुरूष हा २१ जून रोजी मृत पावला होता. तर दोन दिवसापुर्वी काळीपुरा प्रभागातील ७० वर्षीय महिला उपचारार्थ बुलडाणा येथे कोविड रूग्णालयात भरती झाली होती. त्या महिलेचाही आज पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर काही वेळाने तिचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज मलकापूरातील दोन्ही पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

0 टिप्पण्या