फरकांडे येथे रोग प्रतिकार गोळ्या स्वखर्चाने वाटप
ता ,एरंडोलफरकांडे प्रतिनिधी( हेमराज चौधरी)
फरकांडे येथे कोरोना चा शिरकाव झाल्याने गावाच्या सुरक्षेसाठी मुंबई येथे उदरनिर्वाहस गेलेला तरुण गोपाल दगडू पाटील व त्याचा गावातील चुलत भाऊ राकेश भिकन पाटील या तरुणांनी पुढाकार घेतला. गावातील नागरिकांची रोग प्रतिकार क्षमता वाढावी व त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे त्यासाठी राकेश पाटील व गोपाल पाटील या तरुणांनी गावात होमिओपॅथिक गोळ्या वाटप केल्या. कोरोना आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या विषाणूचा जास्त संसर्ग होऊ नये म्हणून. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सावधानता बाळगली पाहिजे. कोरोना या आजारावर औषध नसल्याने आयुष मंत्रालयाने रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक गोळ्याची शिफारस केली आहे. त्यानुसार गावातील या तरुणांनी स्वखर्चाने गोळ्या वाटप केल्या. त्यामुळे गावातील नागरिकांनी आशीर्वाद देत समाधान व्यक्त केले. गोळ्या वाटप करतेवेळी राकेश पाटील मंगेश चौधरी समाधान चौधरी दिलीप चौधरी आदी नागरिक दिसत आहे

0 टिप्पण्या