बँड मालकांकडून कारागिरांचे होणारे शोषण थांबवा पी.आय.अंबादास मोरे यांच्याकडे बँड कारागिरांनी केली तक्रार

बँड मालकांकडून कारागिरांचे होणारे शोषण थांबवा पी.आय.अंबादास मोरे यांच्याकडे बँड कारागिरांनी केली तक्रार

अमळनेर(प्रतिनिधी)-सत्तार खान
 कोरोनामुळे हातमजुर,सलून व्यवसायिक,ऑटो रिक्षा चालक, खाजगी वाहन धारक,हॉटेल व्यावसायिक यासह बँड व्यवसायात कारागीर म्हणून काम करणाऱ्यांना लॉक डाऊन चा फार मोठा फटका बसला आहे.त्यातच ज्या बँड मालकांकडे आपण इमान इतबारे काम करतो त्या बँड मालकांनीही आम्हाला वाऱ्यावर सोडत ,लॉक डाऊन काळात आम्हा कारागिरांना मदत न करता उलट पुढच्या वर्षी तुम्हाला आमच्याकडे फुकट काम करावे लागेल असे बँड मालक धमकावीत असल्याची लेखी तक्रार पी.आय.अंबादास मोरे यांच्याकडे कारागिरांनी केली आहे.
         या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर मधील असंख्य कारागीर हे दरवर्षी चार महिन्याकरिता बँड मध्ये काम करत असतात.तसा बँड मालक कारागिरांकडून करारही करून घेत असतो. यंदा ही 2020 मध्ये बँड मालकांनी कारागिरांना 4 महिन्यांकरिता करार करून कामावर ठेवले.नोव्हेंबर ते मार्च पर्यंत कारागिरांनी आपापल्या बँड पथकामध्ये इमानइतबारे  वाजंत्री वाजाविण्याचे काम करीत राहिले.नंतर 23 मार्च पासून लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे लग्न सराई रद्द झाली व बँड मालकांसह कारागीर ही घरीच बसले.महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव होणे ही एक नैसर्गिक बाब असून ,लॉक डाऊन मुळे सर्व बँड कलावंत बेरोजगार झालेत,त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.करारानुसार जून पर्यंत कारागिरांनी बँड मालकांकडे काम करणे अपेक्षित होते.परंतु लॉक डाऊन मुळे लग्न सराईच रद्द झाल्याने मार्च पर्यंत कारागिरांनी काम केले.
      कारागीर बेरोजगार झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले. दरम्यान काही कारागीर  बँड मालकांकडे उर्वरित रक्कम मागण्यासाठी व हिशेब करण्यासाठी गेले असता संबंधित बँड मालकांनी त्यांना काहीच आर्थिक मदत दिली नाही व हिशोब ही केला नाही शिवाय उलट पुढच्या वर्षीही तुम्हाला 2 महिने फुकट काम करावे लागेल असे धमकावित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. म्हणून अशा पद्धतीने बँड मालकांकडून  आमच्या कारागिरांवर होणाऱ्या अन्यायापासून वाचवावे अशी तक्रार अमळनेर पो.स्टे.चे पी.आय.अंबादास मोरे यांच्याकडे केली आहे.तर चौकशी अंती योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासनही यावेळी मोरे साहेबांनी संबंधितांना दिले.
      या तक्रार अर्जावर समाधान बिऱ्हाडे,कांतीलाल गरुड,संतोष चंदनशिव,सलमान पठाण,
रमेश विसावे ,प्रशांत शिरसाठ, रावसाहेब चंदनशिव ,सागर गरुड़ 
किशोर गरुड़,विजय मोरे
रामा चंदनशिव,चुणीलाल मोरे,विकी अंभोरे आदींच्या सह्या आहेत.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या