शिंदखेडा तालुक्यात "साकेत बचाओ, विरासत बचाओ"धरणे आंदोलन संपन्न.

शिंदखेडा तालुक्यात "साकेत बचाओ, विरासत बचाओ"धरणे आंदोलन संपन्न.

अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान

अयोध्या येथे दि.११मे २०२० रोजी लॉकडाउनच्या कालावधीत बांधकामासाठी सपाटीकरण सुरू असतांना तेथे बौद्ध स्तूप व विहाराचे अवशेष सापडले असे बौद्ध जनांच्या लक्षात आले.बुद्धिस्ट इंटरनॅशनल  नेटवर्क मार्फत देशभर याविषयी आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन चार टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा पाच ते नऊ जून याअंतर्गत भारतातील 550 जिल्ह्यांमध्ये 4500 तालुक्यांमध्ये व 31 राज्यांमध्ये तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचे मार्फत भारताचे राष्ट्रपती महामहीम यांचे नावे निवेदन देण्यात आले.
    आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात तेवढ्याच ठिकाणी 22 जून या दिवशी 11 ते 5 वाजे पावेतो धरणे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. अयोध्येचे पूर्वीच नाव हे साकेत आहे.
      भारतीय पुरातत्व विभाग हा ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण व संवर्धन करीत असतो. अयोध्या येथे 70 एकर जी जमीन आहे. भारतीय पुरातत्व विभागाने येथे उत्खनन करून सत्य उजेडात आणावे. येथील 70 एकर जमिनीचे संरक्षण झाले पाहिजे. यासाठी हे धरणे आंदोलन देशभर सुरू आहे.
     शिंदखेडा  येथे देखील हे आंदोलन 22 जून रोजी बौद्ध समाज मंदिर शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते. याशिवाय दोंडाईचे मालपुर ,वरूळ घुसरे , बेटावद, डाबली धांदरणे, बाम्हणे येथे सुद्धा हे आंदोलन सोशल डिस्टंसिंग चे पालन करून केले गेले.
      सायंकाळी ५:३० वाजता वाजता शिंदखेड्याचे तहसीलदार मा.साहेबराव सोनवणे यांच्याकडे हे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे सुपूर्त करण्यात आले.
     या दराने आंदोलनासाठी दोंडाईचा मालपुर येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या धुळे जिल्हाध्यक्षा कल्पनाताई इंदवे यांनी स्थानिक पोलिस पाटील व दोंडाईचा तहसीलदार  यांच्याकडे निवेदन दिले.
       सायंकाळी या धरणे आंदोलनाच्या बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क च्या जिल्हाध्यक्षा मा. कल्पनाताई इंदवे (बुद्धिस्ट इंटरनेशनल यांनी हे निवेदन  दोंडाईचा तहसीलदार  साहेबांना दिले .साकेत अर्थात अयोध्या आहे. याप्रसंगी बिनचे शिंदखेडा संयोजक मा. शशिकांत (अण्णा)जगन्नाथ बैसाणे, बिन चे धुळे जिल्हा महासचिव सुनिल थोरात, बिन चे शिंदखेडा तालुकाध्यक्ष मा. प्रा. मधुकर मंगळे, बहुजन क्रांती मोर्चा शिंदखेडा संयोजक मा.दिनेश मोरे, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. निरंजन वेंदे,शिंदखेडा नगरपंचायत चे नगरसेवक राजेंद्र थोरात, मुस्लिम युवा मंच चे  शकील पिंजारी ,सामाजिक कार्यकर्ते संजीव कुमार जाधव आदी उपस्थित होते.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या