कजगाव व्यापारी पेठ सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यन्तच रहाणार सुरु
प्रतिनिधी शहेबाज शेखजळगाव कजगाव व्यापारी पेठ सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यन्तच रहाणार सुरु लॉकडाऊन नंतर व्यापार साठी मिळालेली शिथिलता मुळे कजगाव च्या बाजारपेठ ला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे वाढलेली ग्राहकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली असल्याने कजगाव व्यापारी असोसिएशन ची बैठक दि.२३ रोजी पार पडली यात सारी दुकान (अत्यावश्यक सेवा सोडुन) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत सुरू ठेवण्याचे ठरविण्यात आले तसेच कापड दुकानावर बस्ता बंदी घालण्यात आली
बाबत वृत्त की कोरोना व्हायरस ने देशभरात हाहाकार माजविला आहे यात जळगाव जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत आहे त्यातच भडगाव तालुक्यातील बाधित रुग्णाचा आकडा शंभरी पार झाला असल्याने ग्रामीण भागात भीतीयुक्त वातावरण तयार झाले आहे कजगाव हे व्यापारी दृष्टया भडगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ परिसरातील चाळीस खेड्याचे केंद्रबिंदु तसेच अनेक ग्रामीण भागातील ग्राहक कोरोना च्या धाकामुळे शहरी भागात जाण्यास घाबरत असल्याने सर्वच दृष्टीने सुरक्षित असलेल्या कजगाव च्या बाजारपेठ मध्ये ग्राहकांची तुफान गर्दी होऊ लागली आहे या गर्दीमुळे व्यापारी धास्तवले असल्याने दि.२३ रोजी कजगाव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्ती अमृतकार यांचे उपस्थितीत व्यापारी वर्गाची बैठक सम्पन्न झाली यात प्रत्येक व्यापाऱ्यांचे मत जाणुन घेण्यात आली असता कजगाव बाजारपेठ सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत सुरू ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले या बरोबरच कापड दुकानदारांनी लग्नाचा बस्ता बंद करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले बस्त्या साठी मोजके तीन,चार सदस्य असल्यास बस्ता करण्यास हरकत नाही मात्र जास्त लोक असल्यास बस्ता न
करण्याचे ठरविण्यात आले प्रसंगी कजगाव चे किराणा,कापड,जनरल,सह विविध प्रकारच्या दुकान चे व्यापारी बैठकीस उपस्थित होते

0 टिप्पण्या