अमळनेर येथील युवक सामाजिक कार्यकर्ते तर्फे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना शहरातील चालु वर्षाची नळ पट्टी व घर पट्टी माफ करावे या विषयी लेखी निवेदन देण्यात आले
मा मुख्याधिकारी सो। डाँ विद्या गायकवाड यांना देण्यातआलेल्यानिवेदनात म्हटले आहे की संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या आहेत मागील चार महिन्यांपासून लाँकडाऊन सुरू असल्याने सर्वाचे व्यवसाय धंदे रोजगार पूर्णपणे बंद असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे कोरोना व्हायरस या महामारीच्या संकटात जळगांव जिल्ह्य़ातील आपले अमळनेर हा तालुका प्रथम क्रमांकावर असताना शहरातील अनेक भाग कंटेन्मेट झोनमध्ये आहेत अश्या बिकट परिस्थिती पाहून महाशयांनी संपूर्ण शहरातील चालु वर्षाची नळ पट्टी व घर पट्टी पूर्णपणे माफ करावी निवेदनावर युवक सामाजिक कार्यकर्ते नविद शेख, गुलाम नबी पठाण, अख्तर अली सैय्यद, जाकिर मेवाती, शेख सईद आदि चे स्वाक्षरी आहे*

0 टिप्पण्या