पहूरला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ;तरीही व्यावसायिक भरवस्तीत बाजार भरविण्यावर ठाम ; प्रशासन हतबल ;जिल्हाधिकाऱ्यांकडून लक्ष देण्याची अपेक्षा .

पहूरला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ;तरीही व्यावसायिक भरवस्तीत बाजार भरविण्यावर ठाम ; प्रशासन हतबल ;जिल्हाधिकाऱ्यांकडून  लक्ष देण्याची अपेक्षा .


जामनेर तालुका प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण
पहूर, ता. जामनेर  (वार्ताहर ) पहूर येथे कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून बाधितांचा आकडा १८ वर पोहचला आहे . तरीही संवेदनशुन्य व्यावसायीक नागरी वस्तीमध्ये आठवडे बाजार भरवित असल्याने नागरीकांची तोबा गर्दी होवून सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा उडत आहे. यातून सामान्य नागरीकांच्या जिवाशीच खेळ खेळला जात आहे .  हा बाजार पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ असून क्वारंटाईन सेंटरला लागूनच आहे . या प्रकारातून प्रशासनाची हतबलता दिसत असून पहुर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायतीचे या कडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
लॉकडाऊन पासून सर्वत्र आठवडे बाजार बंद असून पहूरमध्ये मात्र व्यावसायिकांना बाजार भरविण्याची राजकिय मुभाच दिली गेल्याचे दिसत आहे . या बाजारात पहूर सह परिसरातील  तसेच तालुक्याबाहेरूनही व्यावसायीक , व्यापारी  व खरेदीसाठी नागरीक येत असल्याने कोरोना संसर्गाला पोषक वातावरणच मिळत असल्याचे दिसत आहे . जमावबंदी आदेशाचे होवून सुद्धा
पोलीस प्रशासन केवळ कारवाईची 'नौटंकी ' करत आहे . कारवाई मात्र प्रत्यक्ष 'शुन्य ' आहे.
बस स्थानकावरही व्यावसायीकांना ११ ते ५ ची वेळ ठरविलेली असतानाही  सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरुच आहेत .

मोकळ्या जागेत बाजार भरवा -
जर बाजार भरवायचाच असेल तर दोन्ही ग्रामपंचायतींनी  व्यावसायीकांना तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी . इतर ठिकाणी व्यावसायीकांना प्रशासनाने बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिलेली आहे . त्या धर्तीवर पहूर येथेही अशी व्यवस्था करायला हवी , ज्यामुळे तेथे सोशल डिस्टंन्सीगचे पालन होवून संसर्गाला आळा घालता येईल .

जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा -

कोवीड नियंत्रणासाठी  अभिनव उपक्रम राबविणाऱ्या नुतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कडे लक्ष देण्याची अपेक्षा सुज्ञ नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या