धुळे जिल्ह्यात मालेगाव युनानी काढा पँटर्न राबविण्यासाठी आमदार डॉ. फारूक शाह व जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न...

धुळे जिल्ह्यात मालेगाव युनानी काढा पँटर्न राबविण्यासाठी आमदार डॉ. फारूक शाह व जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न...



देश व मानव सेवेच्या भावनेतून मालेगावच्या धर्तीवर युनानी कोरोना उपचार पद्धतीचे १०० खाटांचे बंद असलेले सार्वजनिक हॉस्पिटल पुन्हा सुरु होणार -- आमदार डॉ. फारूक शाह

प्रतिनिधी  /  नूरुद्दीन मुल्लाजी
(धुळे - दि. २९-०६-२०२०) धुळे शहरात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. परंतु कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात १००० च्यावर गेली आहे. अशी गंभीर परिस्थिती धुळ्यात निर्माण झाली आहे असे असतांना कधी एकेकाळी धुळे शहरापासून ५० कि.मी. अंतरावर असलेले  मालेगावमध्ये अनेक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. याकरिता मालेगाव रेड झोन मध्ये होते परंतु तेथे असलेल्या मन्सुरा युनानी दवाखान्यात युनानी तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून तयार होत असलेल्या युनानी काढयाच्या मदतीने आज मालेगाव हे पूर्णपणे कोरोना मुक्त होतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहराचे आमदार फारूक शाह व धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. संजय यादव साहेब यांची महत्वपूर्ण बैठक आज युनानी डॉक्टर्स यांच्या व आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

सदर बैठकीत धुळे जिल्ह्यात मालेगाव काढा पँटर्न राबविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर असलेल्या सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत मालेगावच्या धर्तीवर युनानी काढा तयार केला आहे यासाठी युनानी डॉक्टरांनी सदर काढ्याच्या बाबतीत त्या काढ्यात असलेल्या औषधी सामग्रींचा (content) प्रस्ताव तयार करून आयुष मंत्रालयाकडे सादर करावा त्याच्या मंजुरी नंतर आपण रुग्णांना त्यांच्या समंतिने सदर काढा देणार असल्याचे निश्चित करण्यात आले. धुळे शहरातील सदयस्थिती बघता कोरोना बाधित रुग्णांची संख्या १००० च्यावर गेली आहे. अशी गंभीर परिस्थिती धुळ्यात निर्माण झाली असतांना आमदार डॉ. फारूक शाह यांच्या प्रयत्नातून व युनानी डॉक्टर्स यांच्या माध्यमांतून सध्या बंद असलेले सार्वजनिक हॉस्पिटल पुन्हा नव्याने सुरु करणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये सर्वांसाठी युनानी काढा उपलब्ध करून देणार असून तेथे सर्दी खोकला - थंडी ताप यासारखे रुग्ण तपासून त्याच्यांवर योग्य ते उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली आहे.

या बैठकीला धुळे शहराचे आमदार डॉ. फारूक शाह यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे, कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, युनानी डॉक्टर्स डॉ. मिनाज काझी, डॉ. इमरान अन्सारी, डॉ. अयाज अन्सारी, डॉ. समीर अफसर, डॉ. अब्दुल अजीज, डॉ. अब्दुल अन्सारी, डॉ. सलमान अन्सारी, डॉ. जावेद हबीब, वसीम अक्रम, युसुफ पिंजारी, हलीम अन्सारी आदी उपस्थित
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या