दिव्यमराठी च्या पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्याबोदवड येथिल पत्रकार बांधवांची तहसीलदार याचे कडे निवेदनाद्वारे मागणी

दिव्यमराठी च्या पत्रकारांवरील गुन्हे मागे घ्याबोदवड येथिल पत्रकार बांधवांची तहसीलदार याचे कडे निवेदनाद्वारे मागणी


प्रतिनिधी :- विठ्ठल चव्हाण
औरंगाबाद येथे कोरोना व्हायरस ने एक प्रकरे कहर केला आहे कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे औरंगाबाद येथील स्थानिक प्रशासनाची असलेली भूमिका जबाबदारी व निष्क्रिय कार्यक्षमता या बद्दल वास्तविकतेचे वृत्त दैनिक दिव्य मराठी मधून प्रसिध्द करण्यात आले आशा गंभीर परिस्थिती चा आढावा जनते समोर मांडल्यामुळे येथील स्थानिक प्रशासनाचे सत्य बाहेर आले आहे याचा याचा मनात संताप घेऊन स्थानिक प्रशासनाने दैनिक दिव्यमराठी चे संपादक प्रकाशक व वार्ताहर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले सत्य परिस्थिती जनते समोर मांडण्याचे काम पत्रकार आपल्या लेखणीतून करत असतात मात्र वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणे म्हणजे एक प्रकारची दडप शाही करून लोकशाहीचा गळा घोटल्या सारख आहे या करिता बोदवड येथे पत्रकार बांधवांच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करत दैनिक दिव्य मराठीचे संपादक प्रकाशक व वार्ताहर यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे या आशयाचे निवेदन तहसीलदार हेमंत पाटील यांचे कडे देण्यात आले 
       यावेळी बोदवड शहर व तालुक्यातील पत्रकार संदीप बैरागी ,निवृत्ती ढोले,गोपीचंद सुरवाडे,रविंद्र मराठे,अमोल अमोदकर, विनोद शिंदे,सुहास बारी,सुनील बोदडे,जितेंद्र पारधी, यावेळी उपस्थित होते
Rea es:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या