-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सावळदबारा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरीच साजरी करा माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुढाळ यांचे आव्हान

सावळदबारा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरीच साजरी करा माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुढाळ यांचे आव्हान
सोयगाव तालुका प्रतिनिधी:- अज्ञानसिंग चव्हाण

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दरवर्षी प्रमाणे अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या थाटामाटात निघत असते परंतु दिड वषाँपासून जगामध्ये कोरोना महाविष्नूच्या पादूभार्वाने थैमान घातले आहे.
या कोरोनाचा कारणामुळे तालुक्यात व सावळदबारा राज्य भरात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे शासनाने सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध आणलेले आहेत ३१ मे सोमवार रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर २९६ वी जयंती अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास नवीन पढीला भविष्यात मार्गदर्शन करणारा आहेत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर येथील एक छोट्याशा खेड्यामध्ये चोंढी या गावी झाला आहे. त्यांचा मल्हारराव होळकर यांच्याशी वयाच्या अवघ्या ८ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांच्याशी झाला....
पतीच्या निधनानंतर त्यांनी राज्यकारभार हाती घेतला न्यादानासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून समाजाला न्याय देण्याचा काम केलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर धनगर समाजाच्या आराध्य दैवत आहेत या जयंतीच्या दरम्यान आप आपल्या घरावर शक्य होईल तेवढे पिवळे झेंडे लावावे पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आदी कोरोना योध्दाचे स्वागत करावे व धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना कोरोना लस संबंधीत जनजागृती करावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व प्रशासन वारंवार सूचना देत असते त्यांचे नियमित नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे न मिरवणूक काडता घरातच राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा फोटो ठेवून रांगोळया काढून घरात पुजन करून घरातच राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करावी अशे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांनी आपल्या कार्यकर्तानां व ग्रामस्थांना आव्हान केले आहे.

advertising articles 2

-->